Maharashtra Police GK question 2024 जनरल नॉलेज हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. सरकारी परीक्षा असली की त्यात एक जनरल नॉलेजचा सेक्शन असतोच असतो. यावरून माणसाची हुशारी कळून येते. तुमचं भलेही गणित वाईट असो किंवा विज्ञानात काही समजत नसो. जनरल नॉलेज हा विषय मात्र फार महत्त्वाचा. आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमचे जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काही प्रश्न सांगत आहोत. हे आपल्याला आपला जीके वाढविण्यास तसेच देश, जग आणि इतिहासाबद्दल माहिती मिळविण्यात मदत करेल.
Maharashtra Police GK question 2024
- महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?– महाराष्ट्र एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? – अहमदनगर
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?- गोदावरी
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? – बल्लारपूर
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? – रेगूर मृदा
- महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? – मुंबई उपनगर
- महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? –गडचिरोली
- महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? – सावित्रीबाई फुले
- महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?– रत्नागिरी
- सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? – गडचिरोली
- भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? – मुंबई
- भारताची आर्थिक राजधानी कोणती ? – मुंबई
- सात बेटांचे शहर कोणते ? – मुंबई
- महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ?– अहमदनगर
- महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? – कोल्हापूर
- महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? – कोल्हापूर
- महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? – गडचिरोली
- अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? – जळगाव
- महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? – नागपूर
- महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? – नांदेड
- मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात – नाशिक
- आपल्या देशाचे नाव काय आहे ? – भारत
- भारताची राजधानी कोणती ? – दिल्ली
- भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? – तिरंगा
- भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? – त्रिमुख सिंह
- भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? – सत्यमेव जयते
- भारताचे राष्ट्रगीत कोणते ? – जन–गण–मन
- भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? – कमळ
- भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? – मोर
- भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? – वाघ
- भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? – वंदे मातरम
- भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? – हिंदी
- भारताची राष्ट्रलिपी कोणती ? – देवनागरी
- भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? – आंबा
- भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? – हॉकी
- भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? – गंगा
- भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? – वड
- भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? – डॉल्फिन
- भारतातील एकूण राज्ये किती आहेत ? – 29
- तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ? –अशोक चक्र
- अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ? – 24
- भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ? – 15 ऑगस्ट
- भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ? – 26 जानेवारी
- महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ? – हरावत (हरियाल)
- महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ? – शेकरू
- महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ? – तामन (मोठा बोंडारा)
- महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? – आंबा
- महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? – मराठी
- महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ? – मुंबई
- महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ? – नागपूर
- महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? – 36
- वर्षातील एकूण दिवस किती असतात ? – 365
- वर्षाचे एकूण आठवडे किती ? – 52
- पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ? -71%
- पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ? -29%
- पृथ्वीचा उपग्रह कोणता ? –चंद्र
- तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ? –मकरसंक्रांत
- मकरसंक्रांतीचा सण केव्हा असतो ?– 14 किंवा 15 जानेवारी
- हिंदूंचे नव वर्ष केव्हा सुरू होते ?– गुडीपाडवा
- नाताळचा सण केव्हा असतो ?– 25 डिसेम्बर
- कोणत्या सणाला नागाची पूजा करतात ? – नागपंचमी
- नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता ?– रक्षाबंधन
- सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले ? – लोकमान्य टिळक
- दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ? – विजयादशमी
- शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता ?-बैलपोळा
- दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? – लक्ष्मी
- दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? – आपटा
- श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता ? – रामनवमी
- श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता ? – गोकुळाष्टमी
- ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय ? – प्राणवायू
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण?– सचिन तेंडूलकर
- भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात ? – डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
- सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? – शुक्र
- स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता ? – शनी
- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? –गुरु
- दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ? – शुक्र
- चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता ? – पौर्णिमा
- चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता ? – अमावस्या
- मोरगावच्या गणपतीचे नाव काय ? – मोरेश्वर
- ओझरच्या गणपतीचे नाव काय ? – विघ्नेश्वर
- थेऊरच्या गणपतीचे नाव काय ? – चिंतामणी
- लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय ?– गिरिजात्मक
- रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ? –महागणपती
- पालीच्या गणपतीचे नाव काय ? – बल्लाळेश्वर
- महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ?- विनायक
- सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय ? – सिध्दीविनायक
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? – यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? – श्रीप्रकाश
- महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? – गंगापूर
- महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? – खोपोली
- महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ? – तारापूर
- महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? – मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते ? – राहुरी
- महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? – प्रवरानगर
- महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती? – इचलकरंजी
- महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोणता ? – चंद्रपूर
- मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? – दर्पण
- मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? – दिग्दर्शन
- मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? – ज्ञानप्रकाश
- महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ? – पुणे
- महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती ? – सातारा
- महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ? – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? – ताज हॉटेल, मुंबई
- एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ? – सुरेंद्र चव्हाण
- भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? – महर्षी धोंडो केशव कर्वे
- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? – वि.स.खांडेकर
- पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ? – वर्धा
- महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ? – सुरेखा भोसले
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ? – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? – सिंधूदुर्ग
- राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ? – श्यामची आई
- महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ? – वडूज
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ? – षण्मुखानंद सभागृह, मूंबई
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ? – अहमदनगर
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ? – मुंबई शहर
- महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ? – कळसूबाई शिखर
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसख्या असणारा जिल्हा कोणता ? – ठाणे
- महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ? – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ? – रत्नागिरी
- महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता ? – चंद्रपूर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ? – आंबोली
- महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ? – सोलापूर
- महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ? – शताब्दी एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ? – अहमदनगर
- शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते ? – शिवनेरी
- निजामशाहीची राजधानी कोणती ? – अहमदनगर
- आदिलशाहीची राजधानी कोणती ? – विजापूर
- शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ? – रायगड
- तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ? – देहू
- जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ? – सिंदखेड राजा
- हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? – औरंगाबाद
- रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?– सावंतवाडी
- महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ? – मराठवाडा
- महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ? – कोल्हापूर
- जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ? – नाथसागर
- कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? – शिवाजीसागर
- प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? – कोल्हापूर
- तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? – तुळजापूर
- साई बाबा मंदिर कोठे आहे ? – शिर्डी
- गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? – शेगाव
- श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ?- अक्कलकोट
- विठ्ठल मंदिर कोठे आहे ? – पंढरपूर
- खंडोबा मंदिर कोठे आहे ? – जेजुरी
- चांदबिबीचा महाल कोठे आहे ? – अहमदनगर
- पेशव्यांची राजधानी कोणती ? – पुणे
- इंद्राच्या नगरीचे नाव काय ? – अमरावती
- बिबी का मकबरा कोठे आहे ?– औरंगाबाद
- ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ?– आपेगाव
पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम
विषय | प्रश्न संख्या | गुण |
अंकगणित | 28 | 28 |
मराठी व्याकरण | 19 | 19 |
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान | 53 | 53 |
एकूण प्रश्न संख्या: 100 | एकूण गुण: 100 |
कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे?
स्ट्रॉबेरीचे बी फळांच्या बाहेर असतात.
जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत?
महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे. म्हणजेच पायलट म्हणून करिअर निवडण्यात आज भारतातील महिला इतर देशापेक्षा पुढे आहेत.
जगातील सर्वात जुने शहर कोणते?
दमास्कस हे जगातील 11000 वर्षे जुने शहर आहे.
नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते?
नारळाचे पाणी रक्तदाब कमी करते.
भारतातील सर्वात जुने शहर कोणते?
शहरे आणि गावांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशियातील सर्वात जुने शहर मानले जाते. त्यातील लोकांच्या वास्तव्याचे पुरावे 3000 वर्षांहून अधिक जुने आहेत.
जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला?
जगातील पहिला मानव आफ्रिकेत जन्माला आला.